तरूणावर विनाकारण दारूच्या नशेत तिघांनी केले धारदार शस्त्राने वार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १ मार्च २०२२ | जळगाव शहरातील चेतनदास मेहता हॉस्पिटल जवळ तरूणावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भोलासिंग बावरी हा सिंधी कॉलनीतील चेतन दास हॉस्पिटलजवळी पान टपरीव मित्र सागर हटकर आणि राम हटकर यांच्यासोबत गप्पा मारत होता. भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय-२५) रा. शिकलकर वाडा, शिरोसोली नाका, तांबापूर हा कुटुंबियांसह वास्तव्याला आहे.

सिंधी कॉलनी येथील चेतनदास मेहता हॉस्पिटल जवळ अज्ञात तीन जणांनी दारूच्या नशेत येवून काहीही कारण नसतांना तिघांना भोलासिंगला बेदम मारहाण केली. तर धारदार शस्त्राने पोटावर वार करून गंभीर जखमी केले. वारं करताच अज्ञात तिघेजण दुचाकीवर बसून पसार झाले.जखमी भोलासिंग याला मित्र सागर हटकर आणि राम हटकर यांनी तातडीने जिल्हा शायकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.

भोलासिंग बावरी याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी भोलासिंग हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या सुचनेनुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रविंद्र चौधरी, किशोर पाटील, सचिन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like