महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या तर्फे जागतिक मृदा दिन साजरा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I महाराष्ट्र शासन, कृषि विभाग यांचेमार्फत दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात येत असतो. त्या अनुषंगाने आज रोजी तरसोद, ता. जि.जळगाव येथे जिल्हास्तरीय जागतिक मृदा दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन तरसोद येथील शेतकरी बांधवांना मृद आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. तसेच मृद आरोग्य पत्रिकेचे सविस्तर वाचन करुन त्याचे महत्व जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, ममुराबाद ता.जि.जळगाव यांनी महत्व स्पष्ट करून मृद पत्रिकेव्दारे जमिनीची कशा प्रकारे निगा राखता येवून कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन कसे घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शेती व्यवसाय करतांना शेती विषयक अद्यावत माहिती होण्याकरीता कृषिक अॅप डाऊनलोड करणेबाबत आवाहन केले..

कृषि सहाय्यक ज्ञानेश्वर पाटील तरसोद यांनी मृदा नमुने कशा प्रकारे घ्यावा याबाबत उपस्थित शेतकरी बांधवाना प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर वरिष्ठ शास्त्रज्ञ, कार्यक्रम समन्वयक, कृतिके, डॉ. हेमंत बाहेती, ममुराबाद यांनी उपस्थित शेतक-यांना जमिनीतील सेंद्रीय कर्ब व जमिनीचा सामु कसा समतोल साधता येईल याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे शेवटी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, जळगाव यांनी जागतिक मृदा दिवसाचे महत्व व जमिनीचे आरोग्य अबादीत ठेवण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजना व बायोडायनामिक कंम्पोस्ट खत जमिनीचे महत्व बाबत माहिती दिली.

या प्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा), कुर्बान तडवी, तालुका कृषि अधिकारी शिवाजी राऊत, जिल्हा मृद सर्वेक्षण व जिल्हा मृद चाचणी अधिकारी संजय पवार, मंडळ कृषि अधिकारी मनोहर जंगले, कृषि अधिकारी मिलींद वाल्हे, बीटीए आत्मा नरेंद्र ( सोनु) कापसे, जळगाव तालुक्यातील कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व समाधान पाटील, जिल्हा संसाधन व्यक्ती, प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना तसेच तरसोद गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like