बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ५ नोव्हेंबर २०२२ |  दरवर्षाप्रमाणे यंदाही बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हातर्फे शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात रंगभूमी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, पियुष रावळ यांच्याहस्ते नटेश्वर व रंगमंचाचे पूजन करण्यात आले. संस्कारभारतीचे सांस्कृतिक विभागप्रमुख दुष्यंत जोशी यांनी नांदी म्हटली. याप्रसंगी चिंतामण पाटील यांनी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य व महत्व उपस्थितांसमोर विषद केले.

कार्यक्रमाला जळगावातील ज्येष्ठ रंगकर्मी अरुण सानप, नितीन देशमुख, संजय पांडे यांच्यासह प्रा.राजेंद्र देशमुख, योगेश शुक्ल, विनोद ढगे, सचिन महाजन, प्रविण पांडे, सुभाष मराठे, ॲड.पद्मनाभ देशपांडे, हनुमान सुरवसे, दिपक महाजन, अमोल ठाकूर, दुर्गेश आंबेकर, नेहा वंदना सुनिल, राहुल वंदना सुनिल, आकाश बाविस्कर, बंडू दलाल, अरविंद पाटील, एस.एस.पाटील यांच्यासह कलावंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषद जळगावच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like