अमळनेर येथे मराठी रंगभूमीदिन उत्साहात साजरा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ५ नोव्हेंबर २०२२ | आज मराठी रंगभूमी दिनानिमित्त  नटराज पूजन सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे अमळनेरातील रसिक तसेच नवे जून्या कलावंत यांनी अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मोरया नाट्य संस्थेच्यावतीने मनोगत व्यक्त करताना संदीप घोरपडे यांनी सांगितले की, आज ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते नटराज पूजन केले. कारण हा रंगदेवतेची सेवा करणारा कलावंत संधी मिळाली असती तर खूप पुढे गेला असता. मी ह्या वर्षी अमळनेरातील म सा प साने गुरुजी वाचनालय व मराठी वाङ्मय मंडळ या तीन संस्था एकत्रितपणे राज्य नाट्य स्पर्धेत नाटक पाठवून चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रयत्न केला, यश आले नाही . परंतु यंदाही या संदर्भात अधिक प्रमाणात इतरांना सहभागी होण्यासाठी आवाहन करीत नवकलाकार निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
या प्रसंगी नरेंद्र निकुंभ यांनी अमळनेरचा नाट्य इतिहासाला उजाळा दिला. महिला कांग्रेस जिल्हा अध्यक्ष सुलोचना वाघ यांनी महिलांना नाट्य क्षेत्रातील अनेक चढ-उतार अधिक बळकटी प्रदान करतात असे सांगून भावना व्यक्त केल्या. साने गुरुजी शाळा चेअरमन हेमकांत पाटील ,सह सचिव अशोक बाविस्कर ,प्रशांत निकम, शुभम निकम, आधार बहूउद्देशिय संस्थेच्या भारती पाटील, दिनेश नाईक ,हेमंत चौधरी, बारस्कर संदीप गौरव ,या कलाकारांच्या व अमळनेर योग समितीच्या कार्यकर्त्यांनी नटराज पूजन करून नाट्य चळवळीला अधिक बळकटी प्रदान करण्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या सर्व आयोजनात गौरीसुत प्रतिष्ठान अमळनेर संस्थेने सहकार्य केले.

 

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like