जामनेर तालुक्यात महिलेचा विनयभंग
खान्देश लाईव्ह | ७ नोव्हेंबर २०२२ | तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. रविवारी ६ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता शौचास जात असताना संशयित आरोपी श्रीराम गोविंदा पाटील याने महिलेशी अंगलट करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेच्या पतीने जाब विचारला असता तिच्या पतीला मारहाण करून दुखापत केली. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी श्रीराम पाटील यांच्या विरोधात जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे करत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम