अंतुर्ली येथे कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ७ नोव्हेंबर २०२२ | अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली रंजाणे येथे कृतिका नक्षत्राच्या मुहूर्तावर कार्तिक स्वामींची यात्रा आयोजित करण्यात आली असून या कालावधीत महिलांसाठी बंद असलेले मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार असल्याने महिलांना दोन दिवस दर्शनाचा योग आहे.

अमळनेर तालुक्यात बोरी नदीच्या काठावर अंतुर्ली येथे पुरातन कार्तिक स्वामीचे मंदिर आहे. येथे कार्तिक महिन्यात पौर्णिमेला यात्रा भरते. विविध खेळणे, खाद्यपदार्थांची दुकाने थाटलेली असतात. यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. कार्तिक महिन्यात कृतिका नक्षत्राच्या मुहूर्तावर महिलांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते. आणि हा योग यंदा कार्तिक पौर्णिमेला सोमवार दि. ७ रोजी सायंकाळी ४ वाजून १७ मिनिटांपासून ते मंगळवार दि. ८ रोजी सायंकाळी ४ वाजून ३२ मिनिटांपर्यंत आहे. तर कृतिका नक्षत्रावर दर्शनाचा योग मंगळवार दि. ८ रोजी १ वाजून ३९ मिनिटांपासुन से बुधवार दि. ९ रोजी मध्यरात्री ३ वाजून ०९ मिनिटापर्यंत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like