चहार्डी येथे महिलेचा विनयभंग

खान्देश लाईव्ह | २० नोव्हेंबर २०२२ | चोपडा तालुक्यातील चहार्डी गावातील एका महिलेचा घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील चहार्डी गावात ५२ वर्षीय महिलाराहत असून शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील आशाबाई अभिमान शिरसाठ व भरत अभिमान शिरसाट यांनी महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केली. तसेच तिच्या भाच्याला देखील मारहाण केली. विवाहितेला अश्लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
हा प्रकार घडल्यानंतर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी भरत अभिमान शिरसाठ आणि आशाबाई अभिमान शिरसाठ यांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप राजपूत करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम