एमआयडीसी पोलिसांचे गावठी दारू अड्ड्यांवर धाडसत्र

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २० नोव्हेंबर २०२२ | अवैध गावठी हातभट्टी दारुच्या भट्ट्यांवर एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी सकाळी ८ वाजता शहरातील सिंधी कॉलनीजवळील कंजरवाडा परिसरात कारवाई करण्यात आली. यामध्ये १ लाख ६१ हजाराचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस अटेंशनला १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॉलनीनजीकच्या कंजरवाडा, तांबापूरा, भिलाटी यासह जाखनी नगरातील गावठी हातभट्टी दारु विक्री करणार्‍यांसह दारु भट्टीचालकांवर एमआयडीसी पोलींसानी शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता कारवाईची मोहीम राबविण्यात आली.

 

या कारवाईत पथकाकडून सुमारे ४ हजार लिटर दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन, १५० लिटर गावठी हातभट्टीची दारु नष्ट करण्यात आली. तसेच ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. गणेश शिरसाळे, सचिन पाटील, महिला पोलीस कर्मचारी निलोफर सैय्यद, हेमंत कळसकर आदींनी केले.

 

याप्रकरणी वैशाली राजेश अभंगे रा. महादेव मंदिर, चंदनाबाई विष्णू अभंगे रा. तांबापुरा खदान, अलका क्रांती बाटुंगे रा. कंजरवाडा, जितेंद्र सुरेश जाधव रा. आठवडेबाजार पोलीस चौकी, संगिता चंदन बाटुंगे रा. सिंगापुर कंजरवाडा, माधूर गोविंदा बाटुंगे रा. सिंगापुर कंजरवाडा, वर्षा गोकुळ बांगडे रा. सिंगापुर कंजरवाडा, हिना प्रशांत गुमाने रा. सिंगापूर, नैनिता मंगलकुमार गुमाने रा. जोशी कॉलनी, बादल देविदास बाटुंगे रा. नवल कॉलनी, लक्ष्मी प्रताप गागडे रा. जाखनी नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like