मुलाच्या लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I तुमच्या मुलाचे लग्न करून देतो, असे खोटे आश्वासन देत एका महिलेची दीड लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी पारोळा पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालूबाई सुभाष पाटील (वय ५५, रा.हिरापूर ता. पारोळा) यांना तुमच्या मुलाचे लग्न करून देतो, असे खोटे आश्वासन देत अनिल संजय पाटील (रा. चोपडा), जितेंद्र अशोक पाटील, नाना पांडुरंग पाटील (दोघं रा.सब गव्हाण), राहुल गोवर्धन बोदरे आणि एका महिलेने त्यांची फसवणूक केली. तसेच लग्न लावण्याच्या नावाखाली ३० हजार रुपये तसेच १ लाख २१ हजारात गंडवले. लग्नाची तारखी निघून गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मालूबाई यांनी पोलीस स्थानक गाठत तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विनोद साळी हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like