विवाहितेला जीवे ठार मारण्याची धमकी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I आपल्या पतीचे एका अन्य महिलेशी असलेले पतीचे अनैतिक संबंध माहित पडताच विवाहितेला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात पतीसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पिडीत विवाहितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, पती प्रमोद छबुलाल सांगळे (रा. कसारा, आरपीएफ कार्यालय) याचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. याबाबत आपल्या माहिती झाल्यानंतर संबंधित महिलेने फोनवरून तुझी मुलगी कोणत्या रिक्षाने कोणत्या शाळेत जाते याची मला माहिती आहे. ती शाळेतून घरी परत येणार नाही, अशी वारंवार धमकी असते. तसेच माझ्या नांदी लागली तर तुझी वाट लावून टाकीन,अशी देखील धमकी दिल्याचे देखील विवाहितेने म्हटले आहे. तसेच आपला पती प्रमोद सांगळे याने देखील व्हाटसअपवर मॅसेज करून तू कितीही कम्प्लेंट कर, माझे काहीही होणार नाही. मी तुझे आणि मुलांचे तुकडे तुकडे करणार आहे. तू माझ्या रस्त्यातील मोठा काटा आहेस, तुला हटवावेच लागेल,अशी धमकी दिल्याचे विवाहितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास म.पो.ना. स्वप्नाली सोनवणे ह्या करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like