विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा उद्या
खान्देश लाईव्ह | १० नोव्हेंबर २०२२ | ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा उद्या दि. ११ नोव्हेंबर पासून सुरु होत असून यामध्ये २८८ मॉडेल्स व पोस्टरचे सादरीकरण केले जाणार आहे.
या विद्यापीठस्तरीय आविष्कार मध्ये ४४५ विद्यार्थ्यांव्दारे २८८ मॉडेल्स व पोस्टर्स चे सादरीकरण केले जाणार आहे. या स्पर्धेत २५४ विद्यार्थिनी व १९१ विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती स्पर्धेचे समन्वयक प्रा. एस.आर. कोल्हे यांनी दिली.
उद्या शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते होणार आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात दिवसभर आपल्या पोस्टर व मॉडेल्सचे सादरीकरण विद्यार्थी करतील. शनिवार दि.१२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार असून त्यासाठी नॅचरली युवर्स बायोटेक, जळगावचे व्यवस्थापक डॉ.निलेश तेली व नोव्होटा थर्माटेक प्रा.लि. चे व्यवस्थापकीय संचालक आर. वाय. चौधरी हे उपस्थित राहणार आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम