विद्यापीठात सायबर सुरक्षेबाबत जनजागृती

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १० नोव्हेंबर २०२२ | ‘सध्या सायबर क्राईमचे प्रमाण वाढले असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व विद्यार्थिनी मधील सजगता वाढावी यासाठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेच्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.

विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळा आणि क्विक हिल फाऊंडेशन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ रोजी एमबीएच्या च्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबद्दल माहिती देण्यात आली. संगणकशास्त्र प्रशाळेचे विद्यार्थी स्वयंसेवक जय पंडित व भावेश थोरात यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

संगणक शास्त्रप्रशाळेतील विद्यार्थी स्वयंसेवक धनराज बोंडे व मानसी बोरोले यांनी सायबर सुरक्षे बद्दल संगणकशास्त्र प्रशाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या दोन्ही सेशनमध्ये त्यांनी २७० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या दोन्ही कार्यक्रमांना संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा.मनीष जोशी, समन्वयक प्रा.राजू आमले, प्रा. सुरेंद्र कापसे व क्विक हिल फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे महेश भर्डी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like