चाळीस गावात वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार
खान्देश लाईव्ह | 30 डिसेंबर २०२२ | तालुक्यातील मेहूणबारे व पातोंडा गावाजवळ दि. २९ रोजी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात भावी नवरदेवासह सात महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पहिल्या घटनेत जामदा येथील ट्रॅक्टर चालक मोहन भाईदास सोनवणे (वय २१) हा तरूण, गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता सुमारास मेहुणबारेकडून तिरपोळेकडे ट्रॅक्टर घेऊन जात होता. वाघी नाल्याजवळ ट्रॅक्टरसह ट्राॅली अचानक उलटले. त्यात मोहन हा ट्रॉलीखाली सापडून ठार झाला. या तरुणाचा नुकताच साखरपुडा झाला होता. दाेन महिन्यांनी त्याचा विवाह होणार होता.
नवविवाहिता ठार
पातोंडा येथील रहिवासी उमेश रघुनाथ रोकडे (वय २७) व त्यांची पत्नी प्रियंका रोकडे (वय २२) हे नवविवाहीत जाेडपे, चाळीसगाव येथून नाशिकला सेवाग्राम एक्स्प्रेसने जाण्यासाठी, गुरूवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दुचाकीने, चाळीसगावकडे जाण्यास निघाले. घरापासून काही अंतरावर चाळीसगाव-भडगाव रस्त्यावर पातोंडा गावाजवळील वळणावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.त्यात प्रियंका रोकडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश रोकडे हे गंभीर जखमी झाले. दोघांचे सात महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम