ग्रामीण बँकेतर्फे मयत खातेदारांच्या वारसांना धनादेशाचे वितरण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 30 डिसेंबर २०२२ | शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेच्या वतीने मयत खातेदारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला.

यावल येथील रहिवासी कै. यतीन जनार्दन फालक व किशोर प्रकाश माळी परिवारावर तरुण मुलगा गमावण्याची वेळ आली त्यांच्या आई-वडील पत्नी व मुले निराधार झाले फालक व माळी यांच्या कुटुंबीयाकडुन महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ४३६ रुपयाचा विमा काढण्यात आला होता.

त्यामुळे मयतांच्या वारसास २ लाख रुपये मिळावे म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल यांच्यावतीने आतापर्यंत १४ मयत व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयाचा धनादेश देण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन मिलिंद धारड, क्षत्रिय व्यवस्थापक एस. जे. पाटील, शाखा व्यवस्थापक आर.बी. हिंगणेकर, उपव्यवस्थापक मयूर पवार, विक्रम धकाते, कार्यालयीन सहाय्यक अविनाश सोनोने, संदेश वाहक महेश खाचणे, भूषण महाजन, यावल नगर परिषदेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्याहस्ते फालक व माळी कुटुंबांना प्रत्येकी २ लाखांचा धनादेश वाटप करण्यात आलेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like