डॉ.बी.जी.शेखर यांची बदली रद्द
खान्देश लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I नाशिक परीक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी सुनील फुलारी यांची चार दिवसांपूर्वीच बदली करण्यात आली होती. मात्र राज्याचे गृह विभागाच्या सहसचिवांनी ही बदली रद्द केली असून सुनील फुलारी यांची आता कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. तर विद्यमान महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांची बदली करण्यात आल्याने त्यांच्याकडे पुन्हा नाशिक परीक्षेत्राची जवाबदारी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गृह विभागाने काढले बदल्यांचे आदेश
राज्यातील आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी शुक्रवार, 16 रोजी काढले आहेत.
अशा आहेत अधिकार्यांच्या नियुक्त्या
अमिताभ गुप्ता- अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा म.रा.
रंजनकुमार शर्मा- अपर पोलिस आयुक्त, पुणे शहर
सुनील फुलारी- विशेष महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र
संजय मोहिते- पोलिस सहआयुक्त, नवी मुंबई
सुरेशकुमार मेंगडे- मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नवी मुंबई
रवींद्र शिसवे- पोलिस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई
मनोज लोहिया- पोलिस सहआयुक्त पिंपरी-चिंचवड
सुहास वारके- विशेश पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था पोलिस महासंचालक म.रा.
संजय दराडे- अपर पोलिस आयुक्त, विशेष शाखा, बृहमुंबई
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम