उद्योजकाची एक लाख 60 हजारांची रोकड लांबविली

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I शहरातील आठवडे बाजारातील एका दुकानावर आलेल्या उद्योजकाची एक लाख 60 हजारांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी भर दिवसा नजर चुकवून लांबवल्याची धक्कादायक घटना 16 रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार अमित गगनदास गेरदा (33, मोहाडी रोड, जळगाव) हे 16 रोजी सायंकाळी शहरातील आठवडे बाजारातील सदगुरू प्लॅस्टीक या दुकानावर कामानिमित्त आले असता त्यांनी वसुलीची रक्कम असलेली निळी बॅग काउंटरवर ठेवली होती मात्र चोरट्यांनी उद्योजकाची नजर चुकवून बॅग लांबवली. या बॅगेत एक लाख 60 हजार 460 रुपयांची रोकड, बिलबुकचा समावेश होता. या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश मुर्‍हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like