साखरपुड्याच्या आद्ल्यादिवशीच तरुणाने संपविले जीवन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १३ नोव्हेंबर २०२२ | १३ नोव्हेम्बरला साखरपुडा होणार असलेल्या तरुणाने १२ रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करीत आपले जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना अमळनेर येथे घडली असून आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. देशमुख नगरातील रहिवाशी तेजस मनोहर देशमुखवय २६ असे मयत तरुणाचे नाव आहे.

तेजस मनोहर मगर या तरुणाचा रविवारी साखरपूडा असल्याने घरात आनंदाचे वातावरण असतानाच शनिवारी सकाळी तरुणाने सलूनमध्ये जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला. मात्र जानवे शिवारात एका विहिरीत त्याने उडी घेऊन तरुणाने आत्महत्या केली.

ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी हलवण्यात आला. दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत तेजसचे लग्न ठरले होते व रविवार, 13 नोव्हेंबर रोजी त्याचा साखरपुडा होणार होता मात्र साखरपुड्याच्या आदल्या दिवशी तेजसने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही. जानवे पोलीस पाटील यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.असून पोलिस कॉन्स्टेबल हितेश चिंचोरे तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like