चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगलपोत केले लंपास

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १२ मार्च २०२२ | जळगाव शहरात सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी किसनराव नगरातील दत्त मंदिराजवळ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगलपोत हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. असून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या चोरट्यांना कितीही धाक दाखवला तरी देखील त्यांचा सुळसुळाट कमी झालेला नाही.

जळगाव शहरातील विवेकानंद नगरात सुनिता रविंद्र कापसे या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १० मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्या शतपावली करण्यासाठी त्या घराबाहेर निघाल्या होत्या. शहरातील किसनराव नगर मधील दत्त मंदिराजवळ पायी जात होत्या. या वेळी संधी साधत अज्ञात दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत तोडून लंपास केल्याची घटना घडली होती. पुन्हा एकदा चोरट्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे त्यामुळे परिसरातील नागरिक खंत व्यक्त करत आहे.

यासंदर्भात सुनिता कापसे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार ११ मार्च रोजी रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like