आज मल्हार हेल्प फेअर 4 चे भव्य उद्घाटन!

खान्देश लाईव्ह | १२ मार्च २०२२ | जळगाव येथील १२ मार्च २०२२ रोजी लाईफ इज ब्युटीफुल फाउंडेशन आयोजित मल्हार हेल्प फेअर 4 सेवाकार्यांचा यांच्या मेळाव्याचे आज सायंकाळी 6 वाजता भव्य उद्घाटन पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. यावर्षी हेल्प फेअर मध्ये नवीन संकल्पना समाविष्ट करण्यात येणार असून स्वयंसेवी संस्थांच्या प्रदर्शनासोबतच यावर्षी शासकीय योजना, रोजगार मेळावा खानदेशी खाद्य जत्रा , करमणूक आणि हॉबी डुबी डू हा विभाग तसेच विविध क्षेत्रातील सेवा भुतांचा सत्कारही या सोहळ्यात करण्यात आला आहे.
हेल्प फेअर हा असा सोहळा आहे जिथे विविध सेवाभावी संस्था गरजवंत व दाते सगळे एकाच ठिकाणी एकत्र येतात आणि सेवाभावी संस्थांचे मनोबल वाढवणे त्यांच्या कार्याचा गौरव करणे त्यांना मदतीचा हात पुढे करणे या सोबतच समाजाला समाज ऋण फेडण्याचे नवे नवे मार्ग दाखवणे विद्यार्थ्यांमध्ये सेवाभावी दातृत्व जाग येणे व तरुण पिढीला सेवा कृत करणे यासाठी नव्या दिशा दाखवणे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते प्रामुख्याने याच हेतूने या सोहळ्याचे मांडणी करण्यात येते दरवर्षी बहुसंख्य संख्येने या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळतो.
यावर्षी या कार्यक्रमाचे आयोजन प्रामुख्याने मुंबई पुणे धुळे नंदुरबार येथे करण्यात येणार असून या माध्यमातून अपंग अंध आणि गरीब होतकरू मुलांच्या कलांचे सादरीकरण केले जाईल मुलांचे सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी हॉबी डुबी डू या विशेष विभागाचे समायोजन करण्यात येणार आहे. साथ स्पोर्ट डान्स म्युझिक यासारख्या छंद वर्गांचे स्टॉल्स देखील लावण्यात येणार आहे.
बचत गटांना उत्पन्न मिळावे आणि प्रदर्शनात आलेल्या जत्रेची मजा चाखता यावी यासाठी या हेल्प फेअर मध्ये विविध बचत गटांचे खानदेशी पदार्थांचे स्टॉल ही लावले जातील करमणुकीसाठी मेजवानीही सादर होईल. प्रत्येक स्टॉलवर आपण त्या संस्थेच्या कार्याची कसे जोडू शकतो शिवाय आपण यामध्ये पैसे कसे गुंतवू शकतो याबाबतची माहिती आपण प्राप्त करू शकतो , जेणेकरून प्रत्येक नागरिक त्यांचे आवडते कार्य करणाऱ्या संस्थेचे आपला परिस्थितीनुसार जोडू शकतील.
जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनात यावे व या कार्यक्रमाचे आनंदाची अनुभूती घ्यावी व सोहळा अधिक आकर्षित करावा असे आवाहन हेल्प फेअर सदस्य श्री. आनंद मल्हारा यांनी केली आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम