आजचे राशिभविष्य, कसा आहे आजचा दिवस
खान्देश लाईव्ह | १४ मार्च २०२२ | मेष : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.कौटुंबिक वातावरण बिघडेल. संयमित राहावे.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता कौटुंबिक सौख्य लाभेल.अनावश्यक गोष्टींत हस्तक्षेप नको. वादविवादापासून दूर राहा.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. सौख्य व समाधान लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.
सिंह : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.
कन्या : आर्थिक लाभ होतील. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.व्यावसायिक उत्कर्ष होईल. प्रसन्नता लाभेल.
तूळ : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवासाचे योग येतील.कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
वृश्चिक : कौटुंबिक सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.पोटासंबंधित विकार होण्याची संभावना. संतुलित आहार महत्त्वाचा आहे.
धनू : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.मानसिकता बिघडवणार्या घटना घडतील.
मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. नव्या दिशा व धोरण यामुळे आर्थिक प्रगती होईल.
कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.परिस्थिती अनुकूल राहील. अचानक धनलाभाचे योग.
मीन : काहींची वैचारिक प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.सामंजस्य व संवाद महत्त्वाचा आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम