चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक झाडाला धडकला ; चालकासह क्लिनर ठार
एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाच्या खदान जवळील घटना
खान्देश लाईव्ह I २ डिसेंबर २०२२ I भरधाव वेगाने जाणार्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या विरुद्ध दिशेला उजव्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडाला जोरदार धडकला. त्यात चालक व क्लीनर हे दोघे ठार झाल्याची घटना एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाच्या खदान जवळ घडली .
खदानी जवळ म्हसावद कडून एरंडोल कडे लोखंडी सळ्यानीं भरलेला माला एमपी ११ एच ०८५२ क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने जात असताना दिसला. यानंतर ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने हा रस्त्याच्या विरुद्ध दिशेला उजव्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडाला ट्रकने मधोमध जोरात धडक दिली. त्यामुळे ट्रकचा समोरील भाग चक्काचूर होऊन ट्रक पलटी झाला.
संदीप पाटील हे तात्काळ ट्रक जवळ गेले व ट्रक मधील चालक प्रकाश गंगाराम बासकले हा कोसळलेल्या झाडाच्या खाली दाबलेला आढळून आला व क्लीनर शाहरूख खान हा गंभीर जखमी अवस्थेत ट्रकच्या बाहेर फेकल्या गेलेल्या स्थितीत होता त्यावेळी आजूबाजूच्या शेतातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.
या अपघाताची तात्काळी १०८ क्रमांकाला व एरंडोल पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. जमलेल्या सर्व ग्रामस्थांनी जखमी क्लीनर शाहरुख खान याला रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयात नेले त्यानंतर क्रेन बोलून अपघातामुळे अडकलेला ट्रक चालक प्रकाश गंगाराम बासकले याची क्रेनच्या साह्याने झाड बाजूला करून सुटका केली तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्यालाही एरंडोल ग्रामीण रुग्णालयात औषध उपचारासाठी रवाना करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात उपचार झाल्यावर शाहरुख खान याला जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला तर चालक प्रकाश बासकले याचे ग्रामीण रुग्णालयात निधन झाले. हा अपघात उमरदे गावाच्या खदान जवळ १ डिसेंबर रोजी पहाटे घडला.
दरम्यान, या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एरंडोल स्थानकाचे निरिक्षक आणि त्यांचे सहकारी करत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम