पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात
खान्देश लाईव्ह | ३१ ऑक्टोबर २०२२ | भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्याक्रमची सुरुवात परीपाठाच्या वेळी सकाळी ठीक ८:०० वाजता करण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या सौ.भारती चव्हाण यांनी नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचे वर्णन केले. त्यांच्या जीवनातील प्रसंग श्रोत्यांसमोर मांडले व विद्यार्थ्यांना त्यांचे विचार आचरणात आणण्यासाठी प्रेरित केले.
शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांच्या हस्ते भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.स्वातंत्र्य संग्रामात दिमाखदार कामगिरी करीत असतांना त्यांनी प्राणांची परवा केली नाही. भारत छोडो आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविला व तीनदा तुरुंगातही त्यांना जावे लागले.आपणही राष्ट्राला एकसंघ ठेवण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे असे मत मांडले. राष्ट्रसेवेला सर्वोच्च प्राथमिकता देणाऱ्या या महान नेत्यांचा हा देश नेहेमीच ऋणी राहीन असा विश्वास दर्शविला.
यावेळी त्यांनी पोदार शाळेच्या शिक्षक , विद्यार्थी ,स्कूल बस कर्मचारी तसेच शिक्षकेतर कर्माच्री यांना राष्ट्रीय ऐक्य व भ्रष्टाचाराविरुद्ध शपथ दिली.
या प्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक दिपक भावसार, पोदार जंबो किड्स च्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शिविली होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम