राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३१ ऑक्टोबर २०२२ | महाराष्ट्रातील मोठमोठे प्रकल्प हे गुजरातला गेल्याने पोलिस भरतीवर स्थगितीमुळे येथील युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून शिंदे -फडणवीस सरकारच्या निषेधार्थ महानगर राष्ट्रवादीतर्फे आज ३१ रोजी विविध घोषणा देऊन निषेध आंदोलन करण्यात आले.
महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक महानगर अध्यक्ष रिकु उमाकांत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलना वेळी वाल्मीक पाटील, अमोल कोल्हे, किरण राजपूत, भगवान सोनवणे, ईब्राहिम तडवी, सुशील शिंदे, साहिल पटेल, रफिक पटेल, चेतन पवार, योगेश साळी, नरेंद्र शिंदे, रहीम तडवी, खलील शेख, हितेश जावळे, शैलेश अभंगे, योगेश कदम, सचिन साळुंखे, विनोद धुमाळ, आकाश हिरवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते .

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like