खिर्डी आरोग्य केंद्राच्या घाणीच्या ढिगाऱ्यावर प्रशासनाने घेतली दखल
खान्देश लाईव्ह | २ मार्च २०२२ | जळगाव शहरातील रावेर तालुक्यातील खिर्डी येथील आरोग्य उपकेंद्रात घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. अखेर आरोग्य केंद्राच्या परिसरातील उकीरड्याचे ढीगारे उचलण्यात आले असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तर नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे.
रावेर तालुक्यातील निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत खिर्डी खु, येथील गावाची लोकसंख्या अंदाजे पाच ते सहा हजाराच्या जवळपास आहे. परंतु या गावात आरोग्य उपकेंद्र घाणीच्या साम्राज्यात व विखळ्यात पडलेल दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात वस्ती असून येथील काही ग्रामस्थ आरोग्य केंद्रात गुरे, ढोरे बांधत असतात व त्याचे शेणखत व उकीरड्यांचे ढीगारे आरोग्य केंद्रात टाकत आहे. याकडे प्रशासनाने देखील दुर्लक्ष केले. यावरून असून ग्रामस्थांमधून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आरोग्य केंद्राच्या रिक्त जागेत अनेक वर्षापासून असलेल्या उकीरड्याचे व कचऱ्यांचे ढीगारे साचले आहे. आरोग्य केंद्राच्या परिसरात उकीरडे साचत असल्याने त्यात डास व मच्छरांचा उपद्रव वाढू शकतो. यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व साथीचे आजारा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव नाकारता येणार नाही. यामुळे रोगराई निर्माण होवून अनेक प्रकारच्या रोगांना निमंत्रण देण्यात येत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला दिसून येत आहे. अनेक परिश्रा नंतर अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. आरोग्य केंद्राच्या परिसरातील उकीरड्याचे ढीगारे उचलण्यात आले असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम