२१ वर्षीय तरुणांने गळफास घेऊन केली आत्महत्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २ मार्च २०२२ | जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी जवळील हनुमान नगर परीसरात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू नोद करण्यात आली आहे.

शहरातील रामेश्वर कॉलनी, मेहरूण परिसरातील हनुमान नगरात ज्ञानेश्वर अर्जुन पाटील वय २१ वर्षीय तरुणांने आत्महत्या केली. फेब्रुवारी दि.१ रोजी सायंकाळी सुमारास घरात कोणी नसताना छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण समजले नाही.
याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली असुन पुढील तपास पो.ना. दत्तात्रय बडगुजर पोलिस करीत आहे.

ज्ञानेश्वर हा जळगाव शहरातील फुले मार्केट येथे एका भांड्यांच्या दुकानात कामाला होता. त्याच्या पश्चात आई – वडील , २ बहिणी १ लहान भाऊ असा परिवार आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजले नाही.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like