स्व. निखिल खडसे यांना अभिवादन
खान्देश लाईव्ह । ३१ डिसेंबर २०२२ । माजी जि. प. सदस्य आदिशक्ती मुक्ताई सह सूतगिरणीचे चेअरमन स्व.निखिल एकनाथराव खडसे यांच्या जयंती निमित्ताने स्व. निखिल खडसे स्मृतीस्थळ येथे आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रोहिणी खडसे, क्रिशिका खडसे, गुरुनाथ खडसे यांच्या हस्ते स्व निखिल खडसे समर खेवलकर, सारा खेवलकर यांच्या हस्ते पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे यांनी आदरांजली पर मनोगत व्यक्त केले.
यावेळी ते म्हणाले स्व. निखिल खडसे हे मनमिळाऊ आणि विनम्र व्यक्तिमत्त्व होते. जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्या कडे कुठलाही व्यक्ती कोणतेही काम घेऊन गेला तरी ते त्या व्यक्तीला मदत करायचे विरोधी पक्षातील व्यक्ती जरी त्यांच्याकडे काम घेऊन गेला तरी त्यांनी कधी काम करायला नकार दिला नाही.
निखिल खडसे हे जिल्हा परिषद निवडणुकीला उमेदवार होते त्यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्व युवराज काका पाटील हे उमेदवार होते.
त्या निवडणुकीत निखिल खडसे हे विजयी झाले. स्व. युवराजकाका आणि मी त्यावेळी तहसील कार्यालय आवारात उभे होतो. विजयी झाल्यानंतर निखिल हे स्व.युवराज काकांकडे येऊन त्यांनी युवराज काकांचा आशीर्वाद घेतला.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम