टॅंकरच्या धडकेत दुचाकीवरील वृद्ध जागीच ठार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ३१ डिसेंबर २०२२ । जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवरील सातपुडा शोरूमसमोर भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी टँकरचालका विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोहर काशिनाथ पाटील (वय-६३) रा. आयोध्या नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मनोहर पाटील हे स्कुटी (एमएच १९ एक्स ८३३४)ने कुसुंबा गावाकडून अजिंठा चौफुलीकडे येत असताना सातपुडा शोरूमच्या समोर भरधाव टँकर क्रमांक (एमएच ४३ व्हाय ८९०२) ने जोरदार धडक दिली. या धडकेत मनोहर काशिनाथ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. टँकर चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like