राहुल गांधी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ; मनसेचे निवेदन
खान्देश लाईव्ह | १९ नोव्हेंबर २०२२ | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘क्रांतिकारक विदा सावरकर’ यांच्याबद्दल अपमानजनक व्यक्तव्य केल्याप्रकणी त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अश्या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने जामनेर पोलिसांत देण्यात आले.
सद्या देशभर काँग्रेसचे नेते भारत जोडो अभियान राबवत असताना देश जोडो हा उद्देध बाजूला ठेवून देश तोडो ही भूमिका रुजविण्यासाठी च अभियान राबवत आहे. हे काल दिलेल्या स्वातंत्र्य सैनिक व क्रांतिकारक वीर सावरकर यांच्या विरोधात गरळ ओकली आहे. ज्या क्रांतिकारक वीर सावरकर यांनी देश स्वतंत्र व्हावा यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं व देशासाठी 2 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली,
स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द व विधान करून महाराष्ट्रात च नव्हे तर देशभरात समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन नवनिर्माण सेनेच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनला देण्यात आले .
यावेळी जिल्हा सचिव डॉ विजयानंद कुलकर्णी , जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील , जळगाव जिल्हाध्यक्ष महिला सेना डॉ भक्ती कुलकर्णी तसेच जामनेर मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम