सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे शहिदांना श्रद्धांजली

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २७ नोव्हेंबर २०२२ | भारताची आर्थिक तसेच महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई या शहरावर आजच्या दिवशी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी अजमल कसाब व त्याच्या दुष्ट सहकारी आतंकवाद्यांनी आज भ्याड पणे हल्ला केलेला होता. त्यात अनेक निष्पाप लोक तसेच भारत मातेचे वीर सुपुत्र, पोलीस या ठिकाणी देशाचे व देशवासीयांचे रक्षण करताना शहीद झालेले होते.  म्हणून 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आणि नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आज सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे संध्याकाळी 6:30 वाजता भीलपुरा चौकात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.

याप्रसंगी सै. अयाझ अली नियाज अली यांनी मनोगतात कशाप्रकारे दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता व त्याला आपल्या वीर जवानांनी कशाप्रकारे उत्तर दिलेले होते. आपल्या वीर जवानांची शौर्यगाथा उपस्थित लोकांसमोर सांगितली. तसेच अल्लाने फर्मविले आहे की जो कोणी एका निर्दोष व्यक्तीची हत्या करेल त्याला संपूर्ण मानव जातीची हत्या केल्याचा पाप लागेल. अशा अतिरेक्यांना नरकात सुद्धा जागा भेटणार नाही असे उपस्थितांना सांगितले. प्रसंगी पाकिस्तान व आतंकवाद्यांचा निषेध करण्यात येऊन पेटत्या मेणबत्त्या हातात घेऊन दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे, शहीद अशोक कामटे, शहीद विजय साळसकर, शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन, शहीद तुकाराम यांच्यासह निष्पाप शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी सै. अयाझ अली नियाज अली. हाजी शेख सलीम उद्दीन, डॉ.परीमल मुजुमदार, शेख जलालुद्दीन, सुरज गुप्ता, शफी ठेकेदार, मोहम्मद खान, योगेश मराठे, जावेद बागवान, सलमान मेहबूब, झिशान हुसैन, नितीन शिंपी, सय्यद वकार, रहीम कुरेशी, शेख शरीफ, सत्तार शेख, शाकीब फारुख, दानिश कुरेशी, शेख ओवेश, शेख अयान, रिजवान लतीफ, असलम नागोरी, भिकन शिकलकर, शफिक अहमद, आरिफ मुनाफ, अमित मुजुमदार, रवींद्र खैरनार, शेख नवाज, इलियास बागवान, शेख मुजम्मिल, रहीम इस्माईल यांसह नागरिक उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like