महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे गेला तरूणांचा बळी

खान्देश लाईव्ह | ३० मार्च २०२२ | संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव जिल्हा हा उष्ण तापमानासाठी प्रसिद्ध आहे. सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला.अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील तरूणाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.
जळगावात अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील जितेंद्र संजय माळी वय ३३ यांचा उष्णतेचा फटका बसल्याने मृत्यू झाला. जितेंद्र माळी हा खमण विक्री करून आपला उदरनिर्वाह भागवत होता. दुपारी बाराच्या सुमारास घरी येऊन यानंतर शेतात जाऊन त्याने काम केले.
सायंकाळी त्याला शेतात भोवळ आली. शेतातील अन्य मजुरांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून जितेंद्रला अमळनेरला घेऊन जाण्याचे सुचविले. यानुसार अमळनेरला नेत असताना तो रस्त्यात बेशुद्ध पडला. डॉ. आशिष पाटील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.शवविच्छेदनातून जितेंद्र संजय माळी यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम