पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चक्क ५ रुपयेची वाढ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० मार्च २०२२ | तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात ७६ ते ८५ पैशांनी, तर डिझेलच्या दरातही ६७ ते ७५ पैशांनी वाढ झाली आहे.रशिया आणि युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर पडताना दिसत आहेत.

२२ मार्चपासून देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशालाचा चाप बसत आहे. जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव १०८ डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत. तरीही भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे.

त्यामुळे अर्थकारणावर मोठा परिणाम होत असलेला पहायला मिळत आहे. देशांमधील तणाव वाढल्यामुळे सध्या पेट्रोल डिझेलवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे इंधन दरात चढउतार होत असेलेले पहायला मिळतात. मुंबईमध्येही मागील नऊ दिवसांमधील आठव्यांदा झालेली दरवाढ असून पेट्रोल आणि डिझेलचे दर आज प्रति लिटर ८० पैशांनी वाढले आहेत. त्यामुळेच मुंबईत आता पेट्रोल ११५.८८ रुपये लिटर तर डिझेल १००.१० रुपये लिटर दराने मिळत आहे. नऊ दिवसांमध्ये इंधनाचे दर लिटरमागे ५ रुपये ६० पैशांनी वाढल्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like