शर्यत जीवावर बेतली ; दोन तरुण मित्र जागीच ठार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २७ ऑक्टोबर २०२२ | मित्रांसमवेत दुचाकींची राष्ट्रीय महामार्गावर १०० किमी वेगाने शर्यत लावणे दोन मित्रांच्या जीवावर उठल्याची घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास भुसावळच्या राष्ट्रीय महामार्गावर घडली . डम्परला दिलेल्या धडकेत अरफाज मो. इम्तियाज कासीम (वय २२) व गरूड प्लॉट भागातील त्याचा मित्र विष्णू गोविंद कारमुंगे (वय २२) गतप्राण झालेल्या तरुणांची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , सोमवारी रात्री अरफाज व विष्णू एका दुचाकीवर, तर इतर मित्र तीन वेगवेगळ्या दुचाकींवर महामार्गावर आले. तेथे त्यांची साकेगाव ते तनारिका हॉटेल हे अंतर जो आधी पार करेल त्यास १० हजार रुपये मिळतील, अशी शर्यत लागल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. . दरम्यान, तीन केटीएम आणि एका बुलेटवर स्वार असलेले हे मित्र १०० पेक्षा जास्त वेगाने साकेगावकडून हॉटेल तनारिकाकडे निघाले. अरफाज व विष्णू हे एमएच.१९-सीटी.८५७२ या क्रमांकाच्या केटीएम बाइकवर होते. महामार्गावरील मुन्ना तेली यांच्या पेट्रोल पंप परिसरात पटेल टी हाऊस समोर अरफाजचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती पुढील डंपरला धडकली. यानंतर अरफाज व विष्णू हे जागीच ठार झाले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like