यावल येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ८ नोव्हेंबर २०२२ | राष्ट्रवादीच्या नेत्या व महीला खा. सुप्रीया सुळे यांच्या बद्दल कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्या बद्दल त्यांच्या वक्तव्याचा निषेध यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ टी पाँईटवर करण्यात आला .

या वेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध कार्यकर्त आक्रमक होवुन यावल चोपडा राज्य मार्गावरील भुसावळ टी पाँईटवर घोषणाबाजी करून जाहीर निषेध केला. या आंदोलनात राष्ट्रवादीचे एम बी तडवी, ऍड. देवकांत पाटील , माजी नगराध्यक्ष राकेश कोलते , जिल्हा पदाधिकारी विजय प्रेमचंद पाटील ,डॉ हेमंत येवले , अय्युब खान सर , खरेदी विक्री संघाचे माजी संचालक प्रशांत चौधरी , नरेन्द्र शिंदे , कामराज धारू, अरूण लोखंडे , गोलु माळी, आबिद कच्छी, आरीफ खान , हितेश गजरे , रोहन शेख , बापुजासुद,सरफराज तडवी, अब्दुल सईद शेख, राहुल गजरे , डी सी पाटील , दिपक तडवी , मयुर पाटील ,सत्तार तडवी , भुषण नेमाडे,गिरीष पाटील, मोहसीन खान, एजाज देशमुख , समाधान पाटील, शरीफ तडवी , यांच्यासह असंख्य पक्षाचे कार्यकर्त उपस्थित होते .

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like