कंडारी येथील मोबाईल चोरी गुन्हेगारांना पकडण्यात पोलिस निरीक्षकांना यश

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ मार्च २०२२ | जळगाव शहरालगत कंडारी येथील पीओएच कॉलनीत शतपावली करीत निघाले असता विलास विश्वनाथ सोनार यांच्या हातातून दुचाकीवरून तिन भामट्यांनी धूम स्टाईल मोबाईल चोरी केला. शहरातील वाढता चोरट्यांचा सुळसुळाट नागरिकांना भारी पडताना दिसत आहे. त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा देण्याचे काम पोलिस निरीक्षक करत आहेत.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याप्रकरणी निकेश मधुकर वानखेडे सचिन मनोज जाधव, यांना अटक करण्यात आली. तब्बल दोन वर्षानंतर या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.आरोपींच्या ताब्यातून चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आला असून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर संशयीतांनी हा मोबाईल सिध्दांत अरुण म्हस्के रा.पीओएच कॉलनी, आरबी-आय-१९६२ कंडारी, भुसावळ यास अटक करीत आरोपींना भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, एएसआय अशोक महाजन, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like