महिला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा केला प्रयत्न आरोपीला अटक
खान्देश लाईव्ह | २६ मार्च २०२२ | मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव शिवारात विहिरीत महिलेला ढकलून देण्यात आले. ठार मारणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी बारा तासांच्या आत जेरबंद केले आहे. वारंवार लग्नाची मागणी होत असल्याच्या कारणावरून अफसाणाबी या महिलेला मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे शिवारातील रविंद्र पोहेकर यांच्या शेतातील विहिरीत संशयित आरोपी शेख गुलाम इंद्रिस गुलाम हुसैन याने ढकलून दिले.
महिला विहिरीत पडल्याने तिने आपला जीव वाचू नये या करता विहिरीतील विद्यूत मोटारीच्या पाईपाला पकडून धरले होते. ती बाहेर येवू नये म्हणून संशयित आरोपीने मोटारीचा पाईप व वायर कापून तिला पाण्यात बुडवून जीवे ठार केले होते. २७ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मुक्ताईनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या बारा तासात संशयित आरोपीला अटक .महिलेचा भाऊ शेख फरीद शेख मुसा यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसांत आरोपी शेख गुलाम इद्रीस गुलाम रा. हरिपुरा बऱ्हाणपूर मध्यप्रदेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहुल बोरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश मनुरे, पोना संतोष नागरे, मोतीलाल बोरसे, सुरेश पाटील यांनी आरोपीस बऱ्हाणपूर येथून ताब्यात घेतले आहे
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम