ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 15 व 16 डिसेंबर 2022 रोजी आयोजन करण्यांत आलेले आहे. या मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारासाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारणपणे 10 वी व 12 वी ग्रॅज्युएट / कॉम्प्यूटर ऑपरेटर /आय.टी.आय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण 258 रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे.

या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायेजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व तदनंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग – ईन करुन ॲप्लाय करावा.

काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते सध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790  वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता वि. जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like