जळगावच्या उपमहापौरांच्या वक्तव्याचा निषेध
खान्देश लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I जळगाव शहर महानगरपालिकेच्या झालेल्या सभेमध्ये उपमहापौर तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते कुलभूषण पाटील यांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या पेक्षा रावणाचं उदात्तीकरण होण्याच्या उद्देशाने अपमान जनक वक्तव्य केल्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी सावदा शहर व तमाम हिंदुत्ववादी विचारांच्या नागरिकांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, कुलभूषण पाटील यांच्या वक्तव्यामुळे तमाम हिंदू समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झालेली असल्याने तसेच यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करून कुलभूषण पाटील यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, माजी नगराध्यक्ष हेमांगी चौधरी, उपाध्यक्ष नितीन खारे, सरचिटणीस संतोष परदेशी, महेश अकोले, सागर चौधरी, अमित महाजन, संजय तेली, गजानन भार्गव, संजय चौधरी, गुणवंत वायकोळे, प्रतीक भारंबे यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम