जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत युवकांच्या विविध कला गुणांना वाव देवून त्यांच्यातील सुप्त गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे व्दारा प्रतिवर्षी उपलब्ध करुन दिली जात आहे.

या वर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक 30 डिसेंबर ,2022 रोजी करण्यात येणार आहे. सदर युवा महोत्सवामध्ये वय वर्ष 15 पुर्ण ते 29 वर्षाआतील वयोगटातील खालील कलाप्रकाराज युवक-युवती सहभाग घेवु शकतील. ईच्छुक युवक व युवतींनी आपली प्रवेशिका दिनांक 28 डिसेंबर, 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे जमा करावयाची आहे. प्रवेशीवेसोबत जन्म तारखेबाबतचा पुराव रहिवासी असल्याबाबतचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.

युवा महोत्सवाचे परिपत्रक, नियम व अटी खालीलप्रमाणे

कला प्रकार – 1) लोकनृत्य- Folk dance कलाकारांची संख्या सहकलाकारांसह – 20- वेळ मर्यादा – 15 मिनीटे, 2) लोकगीत – Folk song कलाकारांची संख्या सहकलाकारांसह – 10- वेळ मर्यादा – 07 मिनीटे, एकुण 30 सहभागी होतील.

युवा महोत्सवाच्या आयोजनाबाबत महत्वाच्या सूचना नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत. 1) स्पर्धकासाठी /कलाकारासाठी वयोगट 15 ते 29 वर्ष असा राहील. कलाकाराचे वय दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी किमान 15 वर्ष व जास्तीत जास्त 29 असावे. दिनांक 12 जानेवारी 1994 ते 12 जानेवारी 2008 या कालावधीत जन्म झालेला असावा.

2) स्पर्धकाने नाव नोंदणी करतांना प्रवेशिकेसोबत जन्मतारखेचा पुरावा आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला / बोर्ड प्रमाणपत्र व जिल्हयातील रहिवाशी असल्याचा दाखला (डोमेसाईल प्रमाणपत्र/ साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

3) प्रवेशिकेत स्पर्धकाचा अदयावत Whatsapp भ्रमणध्वनी क्रमांक mail id नोंदविलेला असणे आवश्यक आहे.

4) प्रत्येक कलाकाराने विहित नमुन्यातील ओळखपत्र परीपुर्ण भरुन प्रवेश अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. ओळखपत्राचा नमुना कार्यालयातुन उपलब्ध करून घ्यावा.

 

5) दिलेल्या वेळेतच स्पर्धेकाने सादरिकरण करणे आवश्यक आहे. कोणत्याही स्पर्धकास ऐनवेळी स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात येणार नाही. 6) युवा महोत्सव कार्यक्रमात बदल करण्याचा वेळापत्रक रद्द करण्याचा अधिकार आयोजन समितीने राखुन ठेवलेला आहे.

7) परीक्षकांचा निर्णय हा अंतिम व बंधनकारक राहिल. त्याबाबत कोणताही तोडी अथवा लेखी आक्षेप घेता येणार नाही.

8) प्रतिस्पर्धी कलाकाराबाबत काही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यानिशी त्याचवेळी आक्षेप सीध्द कराया 9) मागील तीन वर्षात राष्ट्रिय युवामहोत्सव स्पर्धेमध्ये सहभागी झालेले कलाकार युवक व युवती सहभागी होवू शकणार नाहीत. ( वर्ष 2019-20, 2020-21, 2021-22) 10) स्पर्धकांनी प्रवेश अर्ज दिनांक 28 डिसेंबर, 2022 पुर्वी [email protected] या मेलवर अथवा कार्यालयात सादर करावे.

ज्या स्पर्धकांचे अर्ज दिनांक 28 डिसेंबर, 2022 पर्यन्त [email protected] या मेलवर / प्रत्यक्ष कार्यालयात येतील त्याच स्पर्धकांना सादर करता येईल. 12) कला सादर करताना कुठल्याही प्रकारची ईजा, दुखापत अथवा गंभिर अपघात झाल्यास आयोजन समिती जबाबदार रहाणार नाही. याची सर्व जबाबदारी संबंधित कलाकार व संघव्यवस्थापक यांची राहिल. 13) युवामहोत्सवामध्ये कला सादर करतांना त्यातुन भारतीय / महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन होणे आवश्यक आहे. देशाचे महाराष्ट्राचे महत्व, राष्ट्रिय एकात्मता, सत्याचा मार्गाचे अवलंब, मैत्रिभाव, शांती, समर्पण प्रदर्शीत करणे अपेक्षित आहे. 14) लोकनृत्यासाठी टेप अथवा कॅसेट ला परवानगी दिली जाणार नाही. लोकनृत्य भारतीय शैलीतील असावे. गुणांकन करताना प्रामुख्याने रिदम, कोरीओग्राफी, वेशभूषा, मेकप, सेट व प्रस्तुती विचारात घेवून निर्णय घेतल्या जाईल. 15) लोकगीत हे कोणत्याही प्रादेशिक भाषेतील असावे. लोकगीतामध्ये फील्मी गीत गायला परवानगी दिली जाणार नाही. लोकगीताचा निर्णय गाण्याच्या उत्कृष्टतेवर राहिल, मेकप, वेशभूषा, अॅक्शन वर राहाणार नाही. 16) युवा महोत्सवातील संख्या ही साथसंगत देणा-यासह असल्यामुळे वेगळी साथसंगत घेता येणार नाही. 17)कलाकार सहकलाकार / साथसंगत देणारे, लेखक, निर्माता, दिग्दर्शक, सुध्दा 15 वर्ष पुर्ण 29 वर्षाआतील वयोगटातील असावा. 18) जिल्हास्तर स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त संघ/ स्पर्धेक विभागीय युवा महोत्सव स्पर्धेत सहभागी होईल… 19) आपला प्रवेश अर्ज खालील दिलेल्या नमुन्यात सादर करण्यात यावा.

सदर युवा महोत्सवात सहभागी होणा-या कलाकार युवक व युवती यांनी अधिक माहितीसाठी कीडा अधिकारी श्रीमती सुजाता गुल्हाने, मो.नं. 9763231146 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मिलिंद दिक्षित जळगांव यांनी एका प्रसिध्दी दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like