जळगावात दोघांची ऑनलाईन फसवणूक ; गुन्हा दाखल
खान्देश लाईव्ह | १९ नोव्हेंबर २०२२ | शहरातील दोन जणांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून ७० हजार रुपये अज्ञात व्यक्तीने काढल्याचे लक्षात आल्याने जिल्हापेठ आणि सायबर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल अरण्यात आले आहेत.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, शिरीन गुलामअली अमरेलीवाला (वय ६२, रा.गजानन कॉलनी ) यांच्या मोबाईलवर दि. १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी मो.क्र.९५०५००५६९१५१ धारक याने टेक्स्ट मेसेज करुन क्विक सपोर्ट अँप डाउनलोड करुन त्याद्वारे अमरेलीवाला यांच्या ईनडसईन या बँकेतील एकुण २० हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. अमरेलीवाला यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानुसार याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोहेकॉ गणेश पाटील पुढील तपास करीत आहेत.
महिलेचे ५० हजार काढले
शहरातील अश्विनी जयेश सावकारे (वय ३५, रा. वाघ, जळगाव ) यांना १५ नोव्हेंबर रोजी अज्ञात महीलेने ८४४८४६९४१४ यावरुन फोन करत ऍक्सीस बँकेतून बोलत असल्याचे सांगून विश्वास संपादन करून क्रेडीट कार्डचा ओटीपी मिळविला. . यानंतर अश्विनी सावकारे यांना त्यांच्या खात्यातून ५० हजार ७७४ रुपये ऑनलाईन परस्पर काढले गेले असल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पो.नि. लिलाधर कानडे पुढील तपासकरीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम