रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे शाळेत आसन पट्ट्यांचे वितरण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १९ नोव्हेंबर २०२२ | येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे कंडारी येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व 330 विद्यार्थ्यांना भोजनासाठी बसायला आसन पट्ट्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष विपुल पारेख यांनी आसन पट्ट्यांमुळे अस्वच्छता, कपडे खराब घेणे व खडे टोचणे यापासून विद्यार्थ्याचे संरक्षण होणार असल्याचे सांगितले. प्रकल्प प्रमुख डॉ. विद्या चौधरी यांनी शैक्षणिक उपक्रमांसह स्नेह संमेलन व योगा दिवस अशा वेळी ही विद्यार्थ्यांना या पट्ट्यांचा उपयोग होईल असे प्रतिपादन केले. रोटरी सेंट्रलचे माजी अध्यक्ष व उद्योजक महेंद्र रायसोनी यांनी या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य केले.
प्रास्ताविक शिक्षिका ज्योती वाघ यांनी तर आभार शिक्षिका मंजुषा पाठक यांनी मानले. कार्यक्रमास रोटरी सेंट्रलचे मानद सचिव रविंद्र वाणी, सहसचिव दिनेश थोरात, साधना दामले, मुख्याध्यापक संतोष वानखेडे, रमेश सुर्यवंशी, विनोद जयकर, सुनंदा रोझोदकर, जगदीश पाटील, सविता निंभोरे, गणेश तांबे, साधना सुर्यराव यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like