रणाईचे येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ I तुझे लग्न जमू देणार नाही, अशी धमकी दिल्याने मामाने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद भाच्याने अमळनेर पोलिसात दिली आहे. याप्रकरणी रणाईचे येथील एकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात दिली. आला.

रणाईचे येथील प्रकाश पाटील यांनी फिर्याद दिली की, २१ रोजी दुपारी सुनंदाबाई पाटील ही घरासमोरून जात होती. यावेळी त्यांची मावशी तिच्यात शाब्दिक वाद झाला. सायंकाळी पाच वाजता धनराज रघुनाथ पाटील घरासमोर येऊन शिवीगाळ करत होते. धनराजने मावशी व आजोबांना मारहाण केली. भांडण सोडवायला गेलेल्या मामा विजय पाटील यालाही मारहाण करून तुझे लग्नच जमू देणार नाही आणि लग्न कसे जमते तेच बघतो अशी धमकी यापूर्वीही त्याने मामाला तुझे लग्न जमू देणार नाही, अशी धमकी दिली होती. याचे वाईट वाटून मामा विजय यांनी २३ रोजी सकाळी सातरणे रस्त्यावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like