जळगावात घरफोडी ; ७० हजारांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ I शहरातील महाबळ येथील त्र्यंबक नगरात महिलेचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत शनिवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माया राजेंद्र सोनवणे रा. त्र्यंबक नगर, महाबळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २० डिसेंबर सकाळी १० ते २३ डिसेंबर सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या होत्या. दरम्यान आज्ञात चोरट्यांनी बंद घर असल्याचे पाहून मध्यरात्री घराचे दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेचे भाऊ कुंदन दगडू देसले रा. रायसोनी नगर यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शनिवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like