यावर येथे २ मजूराचा विहीरीत पडून मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ११ मार्च २०२२ | जळगावातील बामणोद यावल तालुक्यातील शेतात काम करनारा २ मजूर विहीरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे परिसरात मजुरां विषयी हळहळ व्यक्त केली जाते.

जळगावातील बामणोद ता.यावल येथे गुरुवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शेतात काम करत असताना हे २ मजदूर विहिरीत पडल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. हे दोन्ही मजदूर रात्रीच्या वेळेस शेतामध्ये काम करत होते. मयत भाऊलाल मोरे व बापू कानळजे असे नाव आहे. दोघ रा. मोयखेडा दिगर ता. जामनेर येथे राहत होते.

घटनाची माहिती कळताच रात्री ११ वाजता सहाय्यक पोलीस निरिक्षक सिध्येश्वर अखेगावकर, पोलीस उपनिरिक्षक मोहन लोखंडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पोलीस नाईक किरण चाटे, विकास सोनवणे, उमेश सानप घटनास्थळी दाखल होऊन रात्री उशिरापर्यत शोध घेतला. तर शुक्रवारी रोजी सकाळी ११ वाजेला एक मृतदेह मिळून आले तर दुसरा मृतदेह शोध सुरु आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like