गिरीश महाजनांच्या विरुद्ध खोट्या षडयंत्रावर कारवाईचे निवेदन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ११ मार्च २०२२ | भाजपाने उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विजय मिळाल्याबद्दल भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मिळवलेल्या यशाबद्दल सावदा येथे येथील बस स्टॅन्ड सायंकाळी 5 वाजता विजयउत्सव साजरा करण्यात आला. त्यांनतर भाजपचे आ.गिरीश महाजन यांच्या विरुद्ध कट रचणाऱ्यांवर कारवाईसाठी निवेदन देण्यात आले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सर्व प्रकरणाची पोलखोल केली. तसेच आमदार गिरीश महाजन यांचे विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून मोक्का लावण्याचा षडयंत्र आहे. याबाबत या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीचे निवेदन सावदा पोनी देविदास इंगोले यांना देण्यात आले.

यावेळी डॉ. अतुल सरोदे, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, सचिव महेश अकोले, पराग पाटील यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉ. अतुल सरोदे, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, पराग पाटील, सचिन ब-हाटे, सागर चौधरी, नेहा गाजरे, गजानन भार्गव, महेश अकोले, संतोष परदेशी, अक्षय सरोदे, नितीन खरे, मुकेश महाजन व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like