सरदार वल्‍लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३१ ऑक्टोबर २०२२ | भारतरत्न, थोर स्वातंत्र्यसेनानी, देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व गोदावरी फाऊंडेशन सदस्य डॉ केतकीताई पाटील यांनी सरदारजी वल्लभभाई पटेल जयंतीदिनी विनम्र अभिवादन केले.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त जळगाव शहरात अभिवादन व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जळगावचे आमदार राजु मामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख भंगाळे आणि लेवा पाटीदार समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. उपस्थीत सर्व मान्यवरांच्याहस्ते प्रतिमापूजन करुन कार्याचे स्मरण करण्यात आले. यानंतर रॅलीला सुरुवात झाली.

मलकापूर येथे एकता रॅली
लोहपुरुष सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्याजयंतीनिमित्‍त सोमवार, ३१ ऑक्टोबर रोजी महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोहपुरुष सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्‍त एकता रॅली काढण्यात आली. याप्रसंगी सर्वपक्षीय मान्यवरांनी रॅलीत सहभाग नोंदविला. शिबिरस्थळी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, गोदावरी फाऊंडेशन सदस्या डॉ.केतकीताई पाटील, डॉ.अरविंद कोलते आदि मान्यवर उपस्थीत होते. मानाचा फेटा परिधान करुन रॅलीत मान्यवर सहभागी झाले. यानंतर उपस्थीत मान्यवरांनी आरोग्य शिबिरस्थळी येवून शिबिराचे कौतुक केले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like