विद्यापीठातर्फे २९ नोव्हेंबर रोजी प्रा. हेमंत खडके यांचे ऑनलाईन व्याख्यान

खान्देश लाईव्ह | २४ नोव्हेंबर २०२२ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या ‘खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी’ ऑनलाईन व्याख्यानमालेत मंगळवार दि. २९ नोव्हेंबर रोजी प्रा. हेमंत खडके यांचे ऑनलाईन व्याख्यान होणार आहे.
डॉ. खडके हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख आहेत. मंगळवारी सायं. ४ वाजता ‘सुखी माणसाचा सदरा’ या विषयावर ते ऑनलाईन व्याख्यान देणार असून अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विनोद पाटील राहतील. अशी माहिती विभागाचे संचालक प्रा. आशुतोष् पाटील यांनी दिली. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर व्याख्यानाची लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम