28 व 29 रोजी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २४ नोव्हेंबर २०२२ | महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रथालय अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 व 29 नोव्हेंबर, 2022 रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय परिसर महाबळ कॉलनी जळगाव येथे ग्रंथोत्सव – 2022 चे आयोजन करण्यात आलेले आहे.

या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन व विक्री आणि साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवातील कार्यक्रमांना आपण मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी केले आहे.

सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर, 2022 रोजी ग्रंथदिंडी – सकाळी 9 वाजता सागर पार्क ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव, सत्र पहिले – दुपारी – 2 ते 4 वाजता – ताणतणाव व्यवस्थापन , सत्र दुसरे दुपारी 4 वाजेपासून खान्देशी बोलीभाषा कविसंमेलन सर्वांसाठी खुले या विषयावर नाव नोंदणीसाठी संपर्क श्री. सुनील जगताप मो.न. 9921351982, कार्यक्रम सुरु होण्याच्या कमीत कमी एक तास अगोदर नावनोंदणी आवश्यक, सहभागी कवींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल, वरील कविसंमेलन हे सर्वांसाठी खुले असून आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त कवींनी सहभाग नोंदवावा

मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सत्र पहिले सकाळी 11 ते 1 वाजता परिसंवाद – प्रसारमाध्यमांचा वाचनसंस्कृतीवर होणारा परिणाम, सत्र दुसरे दुपारी 2 ते 4 वाजता हास्यरंग – थोड बसा आणि भरपूर हसा , दुपारी 4 वाजता प्रमाणपत्र वितरण, सत्कार सोहळा व समारोप कार्यक्रम, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगाव सुहास रोकडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like