महिला कर्मचारीला पाठविला अश्लील मेसेज ; गुन्हा दाखल

खान्देश लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I एका महिला कर्मचारीच्या फेसबुकवर अश्लिल मॅसेज पाठवल्या प्रकरणी जळगाव डेपो आगर येथील सहाय्यक यांत्रिक कर्मचारीविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, पिडीत महिला कर्मचारीला दि. १९ डिसेंबर रोजी १० ते १०:४३ वाजेच्या दरम्यान, जळगाव डेपो आगर येथील सहाय्यक यांत्रिक विजय पी. पाटील (रा.खोटे नगर, जळगाव) याने फेसबुकवर अश्लिल मॅसेज पाठवून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. यानंतर पिडीतेने पोलीस स्थानक गाठत तक्रार दिली. त्यानुसार विजय पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. राजेश पदमर हे करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम