राज्यपाल काेशयारी यांची उपसि्थती महाराष्ट्र चेंबरतर्फे उत्तर महाराष्ट्र विकास परिषद
महाराष्ट्र चेंबरतर्फे उत्तर महाराष्ट्र विकास परिषद आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड ऍग्रिकल्चर उत्तर महाराष्ट्र नाशिक शाखा यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्षभरात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या सुवर्ण महोत्सव वर्ष निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमसाठी माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री छगनजी भुजबळ, कृषी मंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, जळगावचे खासदार उन्मेष पाटील, आरोग्य व कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास आयुक्त दिपेंद्र कुशवाह उपस्थित राहणार आहेत.
उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या व्यक्ती संस्था यांनी भरीव योगदान दिले आणि खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली अशा निवडक संस्थांच्या प्रतिनिधींचा सन्मान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सत्कार समारंभामध्ये येथील हिंदुस्थान एरोनाटिक्स लिमिटेड- नाशिक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा- नाशिक, जैन इरिगेशन सिस्टिमस लिमिटेड -जळगाव, दादासाहेब रावल ग्रुप ऑफ इंडस्ट्री धुळे, शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे, मालपाणी ग्रुप संगमनेर, अहमदनगर, सहयाद्री फार्म-नाशिक, बेदमुथा इंडस्ट्री-नाशिक महाराष्ट्र सलवंत एक्सट्रेक्शन-धुळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम