गिरणा ऑर्गेनिक फार्मिंग क्लस्टरसाठी लोकसभेत खा. उन्मेष पाटील यांची मागणी
जळगाव : गिरणा ऑरगॅनिक कॉरिडॉर (क्लस्टर) उभारण्यात यावे अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी लोकसभेत केली. जिल्ह्यातील गिरणा नदी प्रदूषीत झाली असल्याने गंगा नदीच्या पार्श्वभूमिवर खासदार उन्मेषद पाटील यांनी गिरणेला पुनर्जीवीत करण्याचा संकल्प केला असून यासाठी त्यांनी गिरणा परिक्रमा यात्रा काढली आहे.
गिरणा नदीची सद्यस्थिती जाणून घेत यातून आढळून आलेल्या समस्यांचे निराकरण करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. यासोबत आता त्यांनी लोकसभेतही गिरणा विकासाचा प्रश्न उपस्थित केला आहे. यात त्यांनी गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टरच्या धर्तीवर गिरणा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर (कॉरिडॉर) निर्माण करण्याची मागणी केली आहे.. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी एक जानेवारी पासुन गिरणा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत सुमारे चारशे किलोमीटर ची पाईप आज येत पदयात्रा सुरू केली आहे या पदयात्रेत ते गावोगावी जाऊन शेतकर्यांची सुसंवाद साधला असून गिरणा काठाच्या शाश्वत विकासाची विकासासाठी सोबत काम करण्याचे आवाहन करत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम